‘रावण’ आजोबाने आठवीतील नातीला बनवले वासनेची शिकार, गर्भवती राहिल्यानंतर फुटले बिंग

Foto

औरंगाबाद– जिल्ह्यातील बिडकीनमध्ये आजोबा-नातीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ६५ वर्षांच्या नराधम अजोबाने आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या नातीवर अनेकदा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.  

घरात कोणी नसताना आजोबातील रावण व्हायचा जागा

औरंगाबाद पैठण रोडपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठणखेडा येथील ६५ वर्षीय नराधम आजोबा मागील काही महिन्यांपासून स्वतःच्या नातीला आपल्या वासनेची शिकार बनवत होता. रावणालाही लाजवेल असे कृत्य आजोबाने केले आहे.

पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दुपारच्या वेळी घरी कोणी नसल्यावर या नराधम आजोबातील रावण जागा व्हायचा आणि तो नातीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत होता. याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी हा नराधम मुलीला देत होता. सततच्या अत्याचाराने पीडित मुलगी गर्भवती राहिली. मुलीचे पोट का दुखते यासाठी तिला दवाखाण्यात नेल्यानंतर ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचे पालकांना कळाले आणि रावण अजोबाचे बिंग फुटले. या प्रकरणी रविवारी पीडितेच्या तक्रारीवरुन बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नराधम आजोबाला अटक केली आहे.

पॉक्सो अक्टअंतर्गत गुन्हा दाखल

पीडित मुलीवर बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात पॉक्सो अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला टक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल आईटवर हे करत आहे.